Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेसबुकवर बायकोचे फोटो अपलोड केले तर येऊ लागले फोन, जाणून घ्या काय आहे प्रकरण

फेसबुकवर बायकोचे फोटो अपलोड केले तर येऊ लागले फोन, जाणून घ्या काय आहे प्रकरण
, बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (13:02 IST)
दांपत्य जीवनात वाद विवादानंतर बायकोचे फर्जी फेसबुक आयडी तयार करून तिचे अश्लील फोटो वायरल करणार्‍या नावर्‍याला सायबर क्राईम सेल आणि किठौर पोलिसाने अटक केली आहे.  
 
किठौर थाना क्षेत्राच्या शाहजहांपुर निवासी महिलेने दोन दिवस अगोदर नवरा सलमान, भासरा कामरान, जाऊ हिना, बहीण रिजवाना, सासरे उमरदराज यांच्या विरुद्ध आयटी  अॅक्ट समेत गंभीर कलमांखाली खटला दाखल करण्यात आला. महिलेनुसार, जून-2018 मध्ये तिचे लग्न शाहजहांपुरच्या सलमानाशी झाले होते. काही दिवसांनंतर हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी तिला त्रास देणे सुरू केले. जानेवारी-2019 मध्ये परत ती आपल्या माहेरी येऊन राहू लागली.  
 
तिचे म्हणणे आहे की वाद विवादानंतर तिच्या नवर्‍याने तिच्या नावाने फेसबुकवर फर्जी आयडी तयार केली. त्यात तिचे अश्लील फोटो अपलोड केले. यामुळे ती तणावात आली. अज्ञात लोकांचे तिला फोन येऊ लागले. सायबर क्राईम सेल आणि किठौर पोलिसाने आरोपी सलमानला सोमवारी अटक केली आहे.  
 
या प्रकरणात जे इतर आरोपी आहे, त्यांची तपासणी सुरू आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंदिर जुनं पण पुजारी म्हणून चक्क रोबोट करतोय हे काम