Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक बातमी समोर आली आहे. पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात पतीने सासरवून मिळालेल्या हुंड्याच्या सर्व वस्तू पेटवून दिल्याचा दावा केला जात आहे. तसेच याचा व्हिडीओ देखील वायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बहोदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आनंद नगर येथील ही घटना आहे. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. पहिल्या सामानातील आग विझवण्यात आली. यानंतर पोलिसांनी पती-पत्नी दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये नेले. सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय शेजाऱ्यांनी व्यक्त केला. पत्नी हुंड्यासाठी टोमणे मारते म्हणून पतीने सासरच्यांकडून मिळालेल्या सर्व वस्तूंना भांडणानंतर रागाच्या भरात आग लावली. भांडणानंतर रागाच्या भरात पतीने मुद्दाम आग लावल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.