Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ICSE सेमिस्टर 2 परीक्षा 2022: ICSE बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू होत आहे, विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

exam
, सोमवार, 25 एप्रिल 2022 (13:42 IST)
इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (ICSE) किंवा इयत्ता 10वी सेमिस्टर 2 परीक्षा आज  25 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहे. 23 मे पर्यंत परीक्षा सुरू राहणार आहे. पहिल्या दिवशी दहावीचा इंग्रजीचा पेपर आहे. विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी 90 मिनिटे मिळतील.याशिवाय त्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 10 मिनिटे मिळतील.
 
विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र सोबत ठेवावे. याशिवाय, परीक्षा देणार्‍या उमेदवारांना (ICSE सेमिस्टर 2 परीक्षा) खाली दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल.
1 विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी लागेल आणि स्वतःचा मास्क आणि सॅनिटायझर आणावे लागणार.
2 परीक्षा सुरू होण्याच्या 5 मिनिटे आधी तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये बसावे लागणार.
3 तुम्हाला तुमची सही उत्तर पुस्तिकेवर दिलेल्या जागेत टाकावी लागेल. उत्तरपत्रिका घाण करू नये.
4 तुमचा UID, इंडेक्स नंबर आणि विषयाचे नाव लिहायला विसरू नका. परीक्षेत फक्त काळा किंवा निळा पेन वापरावे .
5. उत्तरपत्रिकेच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूंना मार्जिन सोडा. नवीन प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, एक किंवा दोन ओळी वगळा आणि नंतर उत्तर लिहिण्यास सुरु करा.
6 परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाऊ नये. परीक्षा हॉलमध्ये कॅल्क्युलेटरलाही परवानगी नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Devendra Fadanvis LIVE हनुमान चालिसा वाचणे देशद्रोह आहे का?