Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोलकाता,बदलापूर प्रकरणात पंतप्रधान मोदींनी महिलांविरोधातील गुन्हांवर भाष्य केले

modi
, सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (12:03 IST)
कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या दोन मुलींचे आणि महिलांवरील अत्याचाराविषयी पंतप्रधानांनी भाष्य केले. महिलांवरील गुन्हे हे अक्षम्य पाप असल्याचे नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. दोषी कोणीही असो कुणाला सोडले जाऊ नये.त्यांना वाचवणाऱ्यांना देखील सोडले जाऊ नये.कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा घडला तरी सर्वांचा हिशेब घ्यायला हवा. महाराष्ट्रातील जळगाव येथे लखपती दीदी परिषदेदरम्यान पंतप्रधान जाहीर सभेला संबोधित करताना बोलत होते.

पंतप्रधानांनी बचत गटांना पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले. याशिवाय 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र देण्यात आले. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, आज देशातील प्रत्येक राज्य आपल्या मुलींच्या वेदना आणि संताप समजून घेत आहे.

आमचे सरकार मुलींसाठी प्रत्येक क्षेत्र खुले करत आहे, जिथे एकेकाळी त्यांच्यावर बंधने होती. आज तिन्ही लष्करात महिला अधिकारी तैनात करण्यात आल्या आहेत. महिलांना फायटर पायलट म्हणून तैनात केले जात आहे. शेती आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रापासून ते स्टार्टअप क्रांतीपर्यंत मोठ्या संख्येने मुली गावात व्यवसाय सांभाळत आहेत. ते म्हणाले, सरकारने गरिबांसाठी बांधलेली घरे महिलांच्या नावावरच नोंदवली जावीत, असा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. आतापर्यंत बांधण्यात आलेल्या चार कोटी घरांपैकी बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत. आम्ही आणखी तीन कोटी घरे बांधणार आहोत. यातील बहुतांश माता-भगिनींच्या नावावर असतील.असे ते म्हणाले. 

मोदी सरकारने देशातील भगिनी आणि मुलींसाठी जेवढे काम केले आहे तेवढे काम स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने केले नाही. मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी तुमच्याकडे आलो होतो, तेव्हा तीन कोटी बहिणींना लखपती दीदी बनवू, असे वचन दिले होते. गेल्या 10 वर्षात एक कोटी लखपती दीदी (पीएम लखपती दीदी योजना) तयार करण्यात आली. संपूर्ण कुटुंब आणि येणाऱ्या पिढ्यांना सक्षम करण्यासाठी ही एक उत्तम मोहीम आहे. यामुळे गावाची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलत आहे.
Edited by - Priya Dixit   
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जळगांव : पीएम मोदी म्हणाले- महिलांवरील गुन्ह्यांवर कठोर कायदे बनवत आहोत