Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिहोर जिल्ह्यात नागिणीनं घेतला बदला?

सिहोर जिल्ह्यात नागिणीनं घेतला बदला?
, शनिवार, 9 एप्रिल 2022 (14:06 IST)
नाग-नागिन जोडीपैकी एकाची हत्या झाली तर दुसरी बदला घेण्यासाठी येते, असे अनेकदा ऐकायला मिळते. सिहोरमध्येही असे काही घडले की, याला नागाचा सूड म्हटले जात आहे. वास्तविक, सर्पदंशामुळे 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. 
 
ही घटना सिहोर जिल्ह्यातील बुधनी तालुक्यातील जोशीपुरा येथील आहे. येथे राहणारे ग्रामस्थ किशोरी लाल यांच्या घरात गुरुवारी साप बाहेर आला होता. कुटुंबातील लोकांनी मिळून या सापाला मारले. हा सर्व प्रकार घडताच कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याला योगायोग म्हणा की 24 तासांच्या आत रात्रीच्या वेळी एका नागाने घरात घुसून किशोरी लाल यांचा 12 वर्षांचा मुलगा रोहितला चावा घेतला. 
 
सर्पदंश झाल्यानंतर कुटुंबीयांनी रोहितला तातडीने होशंगाबाद जिल्हा रुग्णालयात नेले. तेथून त्याला भोपाळला रेफर करण्यात आले. कुटुंबीय मुलासह भोपाळला जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. निष्पापचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पीएम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांना रात्री नाग सापडला आणि त्यालाही मारले. या घटनेला नागाच्या सूडाशी जोडले जात आहे. नागाने बदला घेतल्याची चर्चा संपूर्ण परिसरात आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंजाब : कार्यालयात मोबाईल फोनच्या वापराबाबत सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे