Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वातंत्र्यदिन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून भाषण

स्वातंत्र्यदिन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून भाषण
, रविवार, 15 ऑगस्ट 2021 (08:00 IST)
आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत.
 
भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्षं साजरे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च मध्ये गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून 'आझादी का अमृत महोत्सव' सुरू केला होता, जो 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सलग आठव्यांदा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत.
 
आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
-देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना वंदन करण्याचा दिवस. देशासाठी सर्वस्व पणाला लावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह झाशीची राणी, राणी चेन्न्मा, राणी गडिल्यू यांच्यासह पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करण्याचा दिवस. देश या महापुरुषांचा ऋणी राहील.
 
-ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या युवा पिढीने देशाचं नाव उज्वल केलं आहे. हे सगळे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. देशासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान. आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी अशी कामगिरी युवा पिढीने केली आहे.
 
-फाळणीच्या अनेक कटू आठवणी आहेत. फाळणीची जखम अनुभवणाऱ्या नागरिकांप्रती आदरांजली देण्याचा दिवस.
 
-आपल्या वैज्ञानिकांनी कोरोनावर लस शोधून काढली. लशीसाठी आपण कोणत्याही देशावर अवलंबून नाही. आपली स्वत:ची लस नसती तर आपलं काय झालं असतं याचा विचार करा. जगभरात कोरोनाचं संकट आहे. आपल्याकडे लस नसती तर आपल्याला लस मिळाली असती का? जगातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू आहे.
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंची उपस्थिती आकर्षणाचं केंद्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जाणार आहे. याशिवाय करोना योद्ध्यांसाठी विशेष ब्लॉकची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्समधून फुलांचा वर्षाव होणार आहे.
 
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रासहित टोकियो ऑलिम्पिकमधील ३२ खेळाडूंना स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर निमंत्रित करण्यात आलं आहे. जवळपास २४० ऑलिम्पिकपटू, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचा सपोर्टचे कर्मचारी आणि स्पोर्ट्स फेडरेशनचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हैती जोरदार भूकंपामुळे हादरली, 29 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, लोकांना आपली घरे सोडून रस्त्यांच्या दिशेने पळावे लागले