जगातील इतर देशांमधील लोकांच्या तुलनेत भारतीय जनतेचा देशातील सरकारवर अधिक विश्वास असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशातील ७३% जनतेचा सरकारवर विश्वास असल्याची आकडेवारी सर्वेक्षणातून पुढे आली आहे. याबद्दलचे ट्विट फोर्ब्स मासिकाकडून करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने लोकशाही असलेल्या जगातील प्रमुख ३४ देशांमध्ये सरकारविषयी लोकांमध्ये असलेल्या विश्वासाबद्दल सर्वेक्षण केले आहे. यामध्ये भारताने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
फोर्ब्स मासिकाकडून जगातील ३४ देशांमधील स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल असलेल्या विश्वासाची पडताळणी सर्वेक्षणातून करण्यात आली आहे. यामध्ये भारताने पहिला क्रमांक मिळवला आहे. देशातील ७३% लोकांचा सरकारवर विश्वास आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, जर्मनी यासारख्या देशांना मागे टाकत भारताने पहिले स्थान पटकावले आहे. फोर्ब्स मासिकाने एका ट्विटच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली आहे. मात्र फोर्ब्सच्या या सर्वेक्षणाची अनेकांनी खिल्ली उडवली आहे.