Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 14 April 2025
webdunia

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

Indian Army Accident
, मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (18:45 IST)
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ  शिवगडच्या डोंगरावर जंगलात मंगळवारी सकाळी लष्कराच्या हेलिकॉप्टरचे क्रॅश लँडिंग झाले आहे. या अपघातात असलेल्या दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळत आहे.
 
जम्मू -काश्मीर पोलिसांच्या मते, हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि संपूर्ण परिसरात धूर पसरला. घटनास्थळी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले आहे.तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमनदलाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
 
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर लष्कराचे असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचे कारण परिसरात मुसळधार पाऊस आणि धुके असल्याचे सांगितले जात आहे. बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून दोन जखमी लष्करी जवानांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. मात्र, दोघंही गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना