Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

State Mourning In India:भारतात एक दिवसाचा राजकीय शोक

Queen Elizabeth
, शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (14:54 IST)
राणी एलिझाबेथच्या निधनाने संपूर्ण यूकेमध्ये शोककळा पसरली आहे. ब्रिटनमध्ये आजपासून 10 ते 12 दिवसांचा राजकीय शोक पाळण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने 11 सप्टेंबर रोजी एक दिवसीय राजकीय शोक पाळण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली.
 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलिझाबेथ द्वितीय यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की महाराणी एलिझाबेथ द्वितीय अशा दिग्गज होत्या ज्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिले.
 
ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले. ती काही काळ आजारी होती. 96 वर्षीय राणी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसलमध्ये राहत होती. येथे तिने अखेरचा श्वास घेतला, ती सर्वाधिक काळ (70 वर्षे) ब्रिटनची राणी होती.
 
ब्रिटनमध्ये आज राजा चार्ल्स पहिल्यांदा ब्रिटनला संबोधित करणार आहेत. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर त्यांचा राष्ट्राला उद्देशून भाषण होणार आहे. उल्लेखनीय आहे की ब्रिटनची सर्वात जास्त काळ राज्य करणारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर लोकांनी बालमोरल पॅलेसच्या बाहेर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फुलांचे गुच्छ ठेवले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Take special care of online shoppingऑनलाइन शॉपिंग करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या,या चुका विसरूही करू नका