चहामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का ?तर ह्याचे उत्तर हो असे घडू शकते. ही घटना इंदूरमध्ये घडली आहे. चहापानामुळे दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. चहा त्याच्या श्वास नळीत अडकला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीने त्याला तातडीनं घेऊन रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते की काही मिनिटांत त्याचा मृत्यू झाला. राज असे या चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे वडील सध्या तुरुंगात आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
सदर घटना इंदूरच्या सिमरोलजवळील बैग्राममधील आहे. दीड वर्षाचा राजला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याचे मामा त्याला एम व्हाय रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याला तपासले आणि त्याच्यावर उपचार सुरु केले. काही वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत राज आपल्या आजी आजोबा आणि आईसोबत सिमरोल मध्ये राहायचा.
पोलिसांनी सांगितले की, राजच्या श्वास नलिकेत चहा अडकला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सांगितले की, लता यांनी सकाळी आपल्या मुला आणि मुलगी साठी सकाळी चहा केला सकाळी राज ने चहा घेतला आणि त्याला खोकला आला नंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याच्या आईने तातडीनं त्याच्या छातीला चोळले आणि रुग्णालयात नेले असता उपचाराधीन असता त्याचा मृत्यू झाला.
राजचे वडील राजेश प्रजापती देवासच्या करणावत गावात राहतात.दोन महिन्यांपूर्वी राजेशच्या विरोधात त्याच्या पत्नी ने मारहाण करण्याचा आरोप करत पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी राजेशला अटक केली असून तो सध्या तुरुंगात आहे. नंतर राज ला घेऊन त्याची आई माहेरी येऊन राहू लागली. सासरच्यांनी कोणत्याही प्रकारचे आरोप करू नये या साठी मयत राजचे शवविच्छेदन करून पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे.