Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भिंत ओलांडून बाहेर निघाली वाघीण, लोकं घाबरले

भिंत ओलांडून बाहेर निघाली वाघीण, लोकं घाबरले
इंदूर- येथील कमला नेहरू प्राणी संग्रहालयाहून रविवारी संध्याकाळी एक वाघीण अचानक 14 फूट उंच भिंत ओलांडून पिंजर्‍यातून बाहेर निघाली. वाघीण बाहेर निघाली म्हणून जूमध्ये हंगामा झाला. तेथील लोकांनी आजूबाजूला लपून प्राण वाचवले. या घटनेत अनेक लोकं जखमी झाले.
प्रत्यक्षदारशींप्रमाणे ‍ही घटना घडली तेव्हा जूमध्ये सुमारे दोन हजार दर्शक होते. हंगामा घडल्यावर त्यांना जूतून बाहेर काढण्यात आले आणि संग्रहालयाचे दार बंद केले गेले. अनेक दर्शक जनावरांच्या हॉस्पिटलमध्ये लपून बसले होते ज्यांना नंतर पोलिस वाहनाच्या मदतीने बाहेर सोडण्यात आले.
 
वाघीण कैदीबागकडे निघाली असल्याची सूचना मिळाल्यावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. सर्व कर्मचारी शोध घेत होते. वाघीण अंधारात लपून बसली होती. शेवटी प्रयत्नांना यश आले आणि ट्रेंकुलाइजरद्वारे तिला पुन्हा पिंजर्‍यात टाकण्यात आले.
 
उल्लेखनीय आहे की काही दिवसांपूर्वी येथून एक मगर पळून गेला असून नंतर तो गणगौर घाटावर सापडला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनफ्रेंड केलंय...