Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट सेवानिवृत्त

विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट सेवानिवृत्त
सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट आता सेवेतून निवृत्त होत आहे. तब्बल 29 वर्षांच्या सेवेनंतर ही युद्धनौका आता नौदलातून 6 मार्चला निरोप घेणार आहे. आयएनएस विराटनं भारतीय नौदलात सामिल होण्याआधी ब्रिटीश नौदलातही सेवा दिली आहे. 18 नोव्हेंबर 1959 मध्ये ‘एचएमएस हर्मिस’ ब्रिटीश नौदल म्हणजेच रॉयल नेव्हीत सामील झाली. 1982 मध्ये अर्जेंटिना आणि युकेमध्ये झालेल्या फाल्कलँड युद्धात ‘एचएमएस हर्मिस’ची प्रमुख भूमिका होती.
 
एप्रिल 1986 मध्ये ‘एचएमएस हर्मिस’ची भारताकडून खरेदी झाली. युकेच्या प्लायमाऊथ कंपनीकडून दुरुस्ती झाल्यानंतर 2 मे 1987 रोजी ‘एचएमएस हर्मिस’ आयएनएस विराट नावानं भारतीय नौदलात दाखल झाली. आयएनएस विराटवर एकाचवेळी 18 लढाऊ विमानं उभी करण्याची क्षमता आहे. एकाचवेळी 750 सैनिकांच्या राहण्याची व्यवस्था आयएनएस विराटवर करण्यात येऊ शकते. आयएनएस विराटचं वजन 28 हजार 500 टन असून, ते खेचण्यासाठी 76 हजार हॉर्सपॉवर क्षमतेचं टर्बाईन लावण्यात आलं आहे. निवृत्तीनंतर आयएनएस विराटचं संग्रहालय म्हणून त्याचा सांभाळ व्हावा, असं बोललं गेलं. मात्र महाकाय युद्धनौकेचा सांभाळ करण्याचा खर्च अधिक आहे. म्हणूनच कुठल्याच राज्यानं सध्या तरी आयएनएस विराटबद्दल अंतिम निर्णय घेतलेला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशभरात बँकांचा एकदिवसीय संप