Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

1 हजार 178 टि्वटर अकाउंट ब्लॉक करण्याचे निर्देश

1 हजार 178 टि्वटर अकाउंट ब्लॉक करण्याचे निर्देश
, मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (15:30 IST)
शेती सुधारणा कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकर्यांमच्या आंदोलनासंबंधी भ्रामक माहिती, चिथावणीखोर साहित्य प्रसारित करणार्या टि्वटरवरील 1 हजार 178 पाकिस्तानी खालिस्तानींशी संबंधित अकाउंटला ब्लॉक करण्याचे निर्देश केंद्र सरकारने टि्वटरला दिले आहेत. परंतु, टि्वटरकडून अद्याप या निर्देशांचे पालन करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे.
 
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ‘किसान नरसंहार'सारख्या हॅशटॅगचा वापर करणार्याश 250 टि्वटर अकाउंटला ब्लॉक करण्याचे निर्देश देखील केंद्राकडून टि्वटरला देण्यात आले होते. गृह मंत्रालयाच्या एका अहवालाच्या आधारे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे निर्देश दिले होते. खालिस्तानींप्रती सहानुभूती असलेल्या शिवाय पाकिस्तानसोबत लिंक असलेल्या अकाउंटचा नव्या यादीत समावेश आहे. तसेच काही स्वचलित चॅटबॉटचाही समावेश आहे. या अकाउंटचा वापर शेतकर्यांच्या आंदोलनादम्यान भ्रामक माहिती पसरवण्यासाठी केला जात आहे, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान हे अकाउंट नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात, या आधारावर या अकाउंटला ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकरी आंदोलनासंबंधी चुकीची माहिती पसरवणार्यांबवर कारवाई न करता नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मायक्रोब्लॉगिंग साईट सरकारच्या रडारवर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो - छगन भुजबळ