Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IOC सत्र 40 वर्षांनंतर भारतात परतले, नीता अंबानींचे ऑलिम्पिक खेळ भारतात आणण्याचे स्वप्न साकार होईल का?

IOC सत्र 40 वर्षांनंतर भारतात परतले, नीता अंबानींचे ऑलिम्पिक खेळ भारतात आणण्याचे स्वप्न साकार होईल का?
, रविवार, 8 ऑक्टोबर 2023 (16:19 IST)
नवी दिल्ली, ऑक्टोबर 08, 2023: नीता अंबानी जेव्हा बीजिंगमध्ये ऑलिम्पिक सत्र आयोजित करण्यासाठी बोली लावत होत्या, तेव्हा भारताच्या बाजूने एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होईल, असे कोणीही वाटले नव्हते. भारताला एकूण 76 पैकी 75 मते मिळाली. मुंबई आता 15 ते 17 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) चे 141 वे सत्र आयोजित करेल. याला ऑलिम्पिक खेळ भारतात आणण्याच्या प्रयत्नांशी जोडले जात आहे.
   
प्रश्न असा आहे की आयओसीचे सत्र भारतात आले आहे पण ऑलिम्पिक स्पर्धाही भारतात येणार का? आयओसी सत्राचे आयोजन करताना नीता अंबानी म्हणाल्या होत्या, "खेळ हे नेहमीच जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी आशा आणि प्रेरणांचे प्रतीक आहे. आज आपण जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहोत आणि मी तरुणांची ओळख ऑलिम्पिकच्या जादूशी करून देण्यासाठी उत्सुक आहे. येत्या काही वर्षांत भारतात ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करणे हे आमचे स्वप्न आहे!"
  
नीता अंबानी भारतात ऑलिम्पिक आणण्याचे स्वप्न का पाहत आहेत आणि आयओसी सत्र इतके महत्त्वाचे का आहेत? खरं तर, आयओसी सत्र हे ऑलिम्पिक खेळांबाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. यामध्ये ऑलिम्पिक चार्टर स्वीकारणे किंवा त्यात सुधारणा करणे,आयओसी  सदस्य आणि पदाधिकारी निवडणे आणि ऑलिम्पिकचे यजमान शहर निवडणे यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची चर्चा जोरात सुरू आहे आणि 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश करण्याचा निर्णय घेतला गेला तर मुंबईतच आयओसीच्या अधिवेशनात त्याची घोषणा करण्यात येईल.
 
आयओसी  सत्रादरम्यान भारताला भेट देणाऱ्या जगातील नामवंत क्रीडा व्यक्तिमत्त्वांची एक मोठी यादी आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख, जगातील सर्वात मोठी फुटबॉल संघटना, फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो, आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सेबॅस्टियन को, मोनॅकोचा प्रिन्स अल्बर्ट दुसरा आणि पोल व्हॉल्ट चॅम्पियन येलेना इसिनबायेवा यांचा या यादीत समावेश आहे.
 
40 वर्षांपूर्वी 1983 मध्ये, नवी दिल्लीने आयओसी सत्राच्या 86 व्या आवृत्तीचे आयोजन केले होते. तेव्हापासून भारत ऑलिम्पिक तर सोडा. आयओसी सत्राचे यजमानपद मिळावे या साठी वाट पाहत होता. अनेक  खेळाडूच्या पिढ्या ऑलिम्पिक भारतात येण्याची वाट पाहत आहेत, पण भारतात ऑलिम्पिक होऊ शकले नाही. कारण ऑलिम्पिक समितीमध्ये भारतासाठी आवाज उठवण्यासाठी एकही खाजगी सदस्य नव्हता. सहा वर्षांपूर्वी नीता अंबानी आयओसी च्या पहिल्या भारतीय खाजगी महिला सदस्या बनल्या. त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आणि 141व्या आयओसी सत्राचे यजमानपद भारताकडे सुपूर्द करण्यात आले.
 
आणि हे फक्त आयओसी चे सदस्य असण्यापुरते नाही तर नीता अंबानी भारतीय खेळांचा चेहरामोहरा बदलत आहेत. आज 2 कोटी 15 लाखांहून अधिक युवा खेळाडू त्यांच्या क्रीडा योजनांशी जोडले गेले आहेत. क्रीडा जगतात केलेल्या त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचा फायदा आशियाई क्रीडा स्पर्धेत पाहायला मिळाला. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या 10 टक्क्यांहून अधिक खेळाडू रिलायन्स फाऊंडेशनशी जोडलेले आहेत.
 



Edited by - Priya Dixit   
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिलायन्स फाऊंडेशनशी संबंधित खेळाडू आशियाई खेळांमध्ये 12 पदके जिंकून चमकले