कानपूरमधील अन्वरगंज-कासगंज रेल्वे मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर सिलिंडर ठेवण्यात आले होते. ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ती सिलिंडरवर आदळल्याने मोठा आवाज झाला. इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवण्यात आली. तपासाअंती 200 मित्र अंतरावरून सीलिंडर जप्त करण्यात आले. आरपीएफकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून एक एलपीजी सिलेंडर, माचिस बॉक्स, पेट्रोल बॉम्बसारखी पेट्रोलने भरलेली बाटली, एक बॅग आणि इतर संवेदनशील वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
एकीकडे या प्रकरणाचा तपास आयबीकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आता या घटनेत पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना आयएसआयएसचीही नावे समोर येत आहेत. या घटनेनंतर भारतातील सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
कानपुर मध्ये हे सिलिंडर भरलेले आढळून आले आहे. रेल्वे अपघात घडवून आणण्याचा प्रयत्नांमागे आयएसआयच्या सांगण्यावरून कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. देशाच्या विविध भागात नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघातांबाबत सुरक्षा यंत्रणांनीही या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे. नुकतेच दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीतून सुमारे 14 ISIS लोकांना अटक केली होती