भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या अँट्रीक्सने 14 देशांच्या 29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून 61 लाख युरोंची कमाई केली आहे. मागच्या चारवर्षात अँट्रीक्सने परदेशी उपग्रहाच्या प्रक्षेपणातून 1 कोटी 57 लाख युरोची कमाई केली आहे. 2017 सालच्या पहिल्या सहा महिन्यात इस्त्रोने 130 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. इस्त्रोने जे परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले ते आकाराने छोटे होते.
इस्त्रोने अलीकडे कार्टोसॅट-2 उपग्रहाचे प्रक्षेपण केले. यावेळी प्रक्षेपकामध्ये कार्टोसॅट मुख्य प्रवाशी तर, अन्य परदेशी उपग्रह सहप्रवासी होते. ऑस्ट्रीया, चिली, बेल्जियम, फ्रान्स, फिनलँड, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, इटली, अमेरिका, लाटीवा, स्लोव्हाकिया आणि यूके या देशांचे नॅनो उपग्रह होते.