Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'त्या' दुकानाच्या नावात बदल करण्याची मागणी करणं ही शिवसेनेची भूमिका नाही

'त्या' दुकानाच्या नावात बदल करण्याची मागणी करणं ही शिवसेनेची भूमिका नाही
, शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (09:19 IST)
शिवसेना कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी कराची स्वीट्स या वांद्रे इथं असणाऱ्या दुकानाचं नाव बदलण्याची मागणी करत दुसरं नाव ठेवण्याती विचारणा दुकान मालकांना केली. पण, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र या भूमिकेवरच निशाणा साधला. 
 
ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करत राऊतांनी अशा प्रकारची मागणी करण्यात काहीच तथ्य नसल्याचं म्हणत पक्षाची बाजू स्पष्ट केली. कराची बेकरी आणि कराची स्वीट्स हे मागील 60 वर्षांपासून मुंबईत आहेत. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. त्यामुळं दुकानाच्या नावात बदल करण्याच्या मागणीत काहीच तथ्य नाही. मुळात या दुकानाच्या नावात बदल करण्याची मागणी करणं ही शिवसेनेची भूमिका नाहीच, असं राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केलं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवे उर्जा धोरण : थकबाकीची रक्कम शेतकर्‍यांनी भरली तर ५० टक्के वीज बिल माफी