Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Jagannath Rath Yatra: पुरीमध्ये आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा निघणार

jagannath yatra 2023
, मंगळवार, 20 जून 2023 (07:31 IST)
ओडिशातील पुरी येथे आज जगन्नाथाची जगप्रसिद्ध रथयात्रा सुरू होणार आहे. दरवर्षी ही यात्रा आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीपासून सुरू होते आणि आषाढ शुक्लच्या दशमीपर्यंत चालते. हा रथ पाहण्यासाठी आणि भगवान जगन्नाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून भाविक मोठ्या संख्येने पुरीत येतात. या वेळीही तीर्थक्षेत्र पुरी येथे हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.
 
सुरक्षा बलाचे 180 प्लाटून (1 प्लाटूनमध्ये 30 कर्मचारी) तैनात करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहराचे वेगवेगळे झोन आणि विभागात विभाजन करण्यात आले आहे. समुद्रकिनारी गस्तीसाठी तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे.
 
2 जुलै पर्यंत इंटरसेप्टर बोटी तैनात केल्या जातील. एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्सवादरम्यान एकूण 125 विशेष गाड्या पुरीला येतील. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने रथयात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
 
मंगळवारी जेव्हा भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांचे रथ श्री गुंडीचा मंदिरात खेचले जातील तेव्हा पुरीमध्ये सुमारे 10 लाख लोक जमा होण्याची अपेक्षा आहे, असे कुमार दास यांनी सांगितले. दरम्यान, देवतांचे तीन मोठे रथ उत्सवासाठी12व्या शतकातील श्री जगन्नाथ मंदिरासमोर रांगेत उभे आहेत.
 
रथ यात्रा 2023 अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरापासून सुरु होईल.रथावर भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्राच्या मुर्त्या स्थापित केल्या जात आहे.  
दर वर्षी आषाढ महिन्याच्या द्वितीय पासून दशमी तिथी पर्यंत भगवान जगन्नाथ आपले बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रेसह यात्रेवर निघतात. खरे तर या रथामागे एक पौराणिक श्रद्धा आहे, ज्यानुसार द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिने द्वारका पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या बहिणीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सुभद्रा आणि बलभद्र यांना रथावर बसवून द्वारकेला प्रयाण केले. अशा प्रकारे दरवर्षी भगवान जगन्नाथासोबत बलभद्र आणि सुभद्रा यांची रथयात्रा काढली जाते.    





Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण', निवडकर्त्याला प्रश्न, दिलीप वेंगसरकर म्हणाले-