सर्वाच्च न्यायालयाचे ४४ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. जगदिशसिंह खेहर यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पदाची शपथ दिली. आज सकाळी राष्ट्रपती भवनात शपथविधीचा कार्यकम झाला आहे. तर न्या. खेहर हे पहिलेच शिख सरन्यायाधीश असून त्यांचा कार्यकाळ २७ ऑगस्टपर्यंत असणार आहे.
खेहर हे अतिशय शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला तर पंजाब विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. सप्टेंबर 2011 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. खेहर हे भारताचे पहिले सिख धर्मीय सरन्यायाधीश आहेत.