Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

जेलमधून बाहेर पडून साध्वीने बघितली बाहुबली, मसाजही करवली

Jailed Gujarat sadhvi goes to Spa
चेकअपच्या बहाणा करून जेलमधून बाहेर आलेल्या एका साध्वीने एका मॉलमध्ये जाऊन मसाज करवली आणि नंतर बाहुबली 2 चित्रपट बघून फरार झाली.
साध्वीचे नाव जयश्री गिरी असे आहे. नोव्हेंबर महिन्यात एका ज्वेलरकडून 5 कोटी रुपये सोनेच्या बिस्किटाची किंमत न फेडल्याच्या आरोपाखाली तिला बनासकांठा जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. पोलिसांप्रमाणे साध्वी मेडिकल चेकअपच्या 
 
नावाखाली जेलमधून बाहेर पडली आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत एका मॉलमध्ये पोहचली. तिथे मसाज करवून तिने सिनेमाही बघितला.
 
साध्वी बनासकांठा जिल्ह्यातील मंदिराचे संचलन करणार्‍या ट्रस्टची प्रमुख आहे. आश्रमात करण्यात आलेल्या छापेमारीमध्ये 80 लाख रुपये किंमतच्या 24 सोन्याच्या स्टिक, 1.29 कोटी रुपये नगद आणि काही दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. उल्लेखनीय आहे की गुजरातमध्ये दारूवर पूर्णपणे बंदी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अबू सालेम, मुस्तफा डोसा दोषी