Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जयपूर :चांदीच्या कड्यांसाठी हल्लेखोरांनी वृद्ध महिलेचे दोन्ही पाय कापले

crime
, सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (19:16 IST)
जयपूरमध्ये रविवारी घरात घुसून चोरट्यांनी 108 वर्षीय महिलेचे पाय कापून चांदीचे कडे लुटण्याची हृदयद्रावक घटना घडली.राजधानी जयपूरमधील मीना कॉलनी गलतागेट येथे जमुना देवी (108) आपली मुलगी गोविंदी आणि नात ममता (22) यांच्यासोबत राहतात. रविवारी पहाटे पाच वाजता चोरटे त्यांच्या घरात घुसले. आरोपींनी त्यांना ओढत बाथरूममध्ये नेले आणि दोन्ही पाय कापून चांदीचे कडे लुटले. सदर महिलेचे हल्लेखोऱ्यानी तोंड दाबून ठेवल्यामुळे तिला आरडाओरडा करता आला नाही.बाथरूममध्ये महिलेला वेदना होत होत्या. तासाभरानंतर कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाली.
 
वृद्ध महिलेनेही गळ्यात सोन्याची साखळी देखील घातली होती,ती ही लुटण्यासाठी आरोपींनी महिलेच्या मानेवर वार केले, मात्र कोणीतरी येण्याच्या भीतीने चोरटे घटनास्थळावरून पळून गेले. पीडित जमुनादेवीची मुलगी आणि नात सकाळी सहाच्या सुमारास उठल्या. त्यांनी पाहिले की जमुना देवी आपल्या पलंगावर नाही. घरातील सर्व वस्तू विखुरलेल्या होत्या. अशा स्थितीत दोघेही जमुनादेवीचा शोध घेऊ लागले. ती बाहेरच्या  बाथरूममध्ये गेली असता, जमुना देवी तिथे जमिनीवर बेशुद्धावस्थेत आढळल्या. महिलेचे दोन्ही पाय कापलेले दिसले.
 
घटनेची माहिती मिळताच गलतागेट पोलिस घटनास्थळी पोहोचले . पोलिसांनी एफएसएल टीमच्या मदतीने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. पोलिसांना बाथरूममध्ये एक मोठा धारदार चाकू सापडला. आता पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासत आहेत. महिलेला जयपूर येथील एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
 
Edited By -Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Russia -Ukraine War :युक्रेनवर 75 क्षेपणास्त्रांचा मारा, शेकडो ठार,अध्यक्ष झेलेन्स्की यांची पुष्टी