कर्जबुडवेगिरी प्रकरणी भारतातून पलायन केलेल्या मद्य व्यापारी विजय मल्ल्याने आज “भारतातून पलायन करण्यापूर्वी भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती” असा दावा करत खळबळ माजवली होती. आज दिवसभर ‘अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती’ असे पत्रकारांना सांगतानाच माल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. माल्ल्याच्या दाव्यावरून विरोधकांनी देखील केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.
दरम्यान मल्ल्याच्या या दाव्याला खुद्द अरुण जेटली यांनी ‘धुडकावले’ असून आपण २०१४ पासून माल्ल्या या इसमास एकदाही भेटलो नसल्याचे जाहीर केले आहे. ट्विटरद्वारे माल्ल्याच्या दाव्यावर बोलताना अरुण जेटली म्हणाले की “माल्ल्या राज्यसभेचा सदस्य असल्याने कामकाजा दरम्याने त्याने याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला परंतु आपण त्याला बँकांशी बोलण्याचे सांगितले. २०१४ नंतर माल्ल्याला आपण भेटीसाठी एकदाही वेळ दिली नसल्याने तो दावा करत असलेली ‘भेट’ घडणे शक्यच नाही.