Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जम्मू -काश्मीर: कठुआच्या रणजीत सागर तलावात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

जम्मू -काश्मीर: कठुआच्या रणजीत सागर तलावात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले
, मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (12:48 IST)
जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यातील बसोहली येथील पुर्थुजवळ भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे.या मध्ये पायलटसह चार जवान असल्याचे सांगण्यात आले आहे.ज्यांच्या शोध सुरु आहे.
 
जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यातील बसोहली येथील पुर्थूजवळ भारतीय लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. येथे पंजाब-हिमाचल सीमा आहे, परंतु हेलिकॉप्टर ज्या भागात कोसळले तो भाग कठुआ जिल्ह्यात येतो.
 
येथेच रणजीत सागर तलाव परिसरात लष्कराकडून प्रशिक्षण कार्यक्रमही राबवला जातो. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात सकाळी 10.50 वाजता झाला. हेलिकॉप्टरमध्ये 5 ते 6 जण असण्याची माहिती येत आहे.
 
हे हेलिकॉप्टर मामुन कॅंट येथून निघाले होते. जो रणजीत सागर तलावात कोसळला. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.शोध आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.स्थानिक पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.
 
याआधी जानेवारी महिन्यात लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर लखनपूरमध्ये कोसळले होते. नियमित पेट्रोलिंग वर असलेल्या या हेलिकॉप्टरने  पठाणकोटमधील ममून कँट येथून उड्डाण केले. जे लखनपूरला लागून असलेल्या लष्करी भागात कोसळले आणि पडले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tokyo Olympics:सोनम मलिक कुस्तीमध्ये रेपेचेज फेरीतून बाहेर