Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IIT-JEE : महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला

IIT-JEE : महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला
, शुक्रवार, 14 जून 2019 (16:56 IST)
Indian Institute of Technology (आयआयटी) प्रवेशसाठीची IIT-JEE Advanced प्रवेश या परीक्षेत महाराष्ट्राच्या कार्तिकेय गुप्ताने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. je&erdved.aced.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन निकाल पाहाता येणार आहे. २७ मे रोजी आयआयटीमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.यंदा जेईईमध्ये पर्सेटाइल पद्धतीचा पहिल्यांदाच अवलंब करण्यात आला. जागतिक स्तरावर वापरली जाणारी आणि अधिक शास्त्रशुद्ध अशी ही पद्धत आहे.
 
जेईई मुख्य सामायिक प्रवेश परीक्षेत कार्तिकेय गुप्ता याने १०० पर्सेटाइल गुण घेत देशातील पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले होते. विशेष म्हणजे, मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील असलेला कार्तिकेय या प्रवेश प्रक्रियेच्या पूर्वतयारीसाठी मुंबईत अॅलन करिअर इन्स्टिट्यूटच्या निवासी हॉस्टेलमध्ये दोन वर्षं स्थायिक झाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांद्रयान – 2 ची कमान सांभाळण्याऱ्या दोन महिला शास्त्रज्ञ कोण?