कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याची घोषणा केली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.
कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन परीक्षा रद्द वा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याकडे राज्य सरकारांसह केंद्राचा कल दिसत आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पहिल्या दोन सत्रातील परीक्षा पूर्ण झालेल्या असून, एप्रिलच्या सत्रात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 27, 28 आणि 30 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती.
परीक्षेसाठी सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या 15 दिवस आधी ही तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे नॅशनलटेस्टिंग एजन्सीने म्हटले आहे.