Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशाचे सात वीरपुत्र शहीद

देशाचे सात वीरपुत्र शहीद
आपला देशाचा अविभाज्य असलेल्या जम्मू काश्मिर येथील नगरोटातील आर्मी कँपमध्ये दहशतवाद्यांशी सुरु असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे 7 जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्राचे दोन वीरपुत्रही आपले जीवन देशासाठी आपले प्राण दिले. 
 
यामध्ये आपल्या राज्यातील 35 वर्षीय संभाजी यशवंत कदम हे नांदेड जिल्ह्यातील जानापुरी गावचे आहेत. तर दुसरे वीरपुत्र  वर्षांचे मेजर कुणाल गोसावी हे पंढरपूरचे आहेत. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरु आहे. पोलिसांच्या वेशात शिरलेल्या काही दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जवान शहीद झाले.
 
मंगळवारी सकाळी जम्मूच्या उपनगराबाहेर असलेल्या 166 क्रमांकाच्या युनिटवर 3 ते 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर भारतीय जवानांनीही हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. ज्यात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. मेजर कुणाल गोसावी नऊ वर्षांपूर्वीच सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी उमा, मुलगी आणि दोन भाऊ आहेत. 
 
काश्मीरमधल्या उरीमध्ये लष्करी तळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. त्यानंतरचा हा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्राचा संभाजी काश्मिर मध्ये शहीद