Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेएनयूत वि‍द्यार्थ्यांचा लाल सलाम कायम

जेएनयूत वि‍द्यार्थ्यांचा लाल सलाम कायम
नवी दिल्ली , सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (12:28 IST)
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनांनी आपले वर्चस्व कायम ठेवत चारही जागांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. अभाविपचे उमेदवार दुसर्‍या स्थानी राहिले, तर बाप्सा तिसर्‍या स्थानावर राहिली.
 
ऑल इंडिया स्टुडंट्‌स असोसिएशन, स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया, डोमेक्रेटिक स्टुडंट्‌स फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंट्‌स फेडरेशन या डाव्या संघटनांनी 'लेफ्ट युनिटी' म्हणून एकत्रित निवडणूक लढवली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन. बालाजी याने अभाविपच्या ललित पांडेचा 1179 तांच्या अंतराने पराभव केला. 
 
उपाध्यक्षपदी सारिका चौधरी (2592), महासचिवपदी एजाज अहद राथेर (2426) आणि संयुक्त सचिवपदी अमुथा राजदीप (2047) मते मिळवत विजयी झाले.
 
देशभरातील विद्यार्थी चळवळ, राजकीय जाणकारांच्या नजरा या निवडणुकीकडे लागले होते. केंद्रात भाजप नेतृत्वातील सरकार आल्यानंतर भाजपप्रणित अभाविपने जेएनयूच्या विद्यार्थी निवडणुकीत विजय मिळवण्याचे जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत अभाविपचा दारुण पराभव झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेत कुत्रे-मांजर मारून खाणे प्रतिबंधित, साडे तीन लाख दंड