Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तेलंगणचे मुख्यमंत्री तिरुपतीला 5 कोटींचे दागिने अर्पण करणार!

तेलंगणचे मुख्यमंत्री तिरुपतीला 5 कोटींचे दागिने अर्पण करणार!
विजयवाडा , बुधवार, 22 फेब्रुवारी 2017 (10:58 IST)
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव प्रसिद्ध तिरुपती मंदिरात 5 कोटी रुपये किंमतीचे दागिने चढवणार आहेत. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार तेलंगण हे स्वतंत्र राज्य स्थापन व्हावे यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी भगवान व्यंकटेश्वराला नवस केला होता. आज बुधवारी सकाळी 5 कोटींचे दागिने अर्पण करून ते आपला नवस फेडणार आहेत.  
 
मुख्यमंत्री झाल्यानंतर राव यांची व्यंकटेश्वराच्या मंदिराला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. राव आपला नवस फेडताना जे दागदागिने अर्पण करणार आहेत त्या दागिन्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. या दागिन्यांमध्ये हिर्‍यांनी मढवलेल्या सोन्याच्या 'शालीग्राम हरम'चा समावेश आहे. शिवाय 'मकर कंठी' आणि इतर अनेक दागिन्यांचा समावेश आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनपासाठी 56 तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 69 टक्के मतदान