परदेश मंत्रालयाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेसाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. बुधवारपासून पवित्र समजल्या जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी नोंदणी करणाऱ्या इच्छुकांचे वय 1 जानेवारी 2017 पर्यंत कमीत कमी 18 वर्ष आणि 70 पेक्षा अधिक असू नये. ही कठीण यात्रा दोन मार्गांवरून 12 जून ते 8 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. पहिला मार्ग लिपुलेख पास (उत्तराखंड) मधून आहे, यासाठी एका व्यक्तीला 1.6 लाखाच्या आसपास खर्च येतो. 15 मार्च 2017 पर्यंत तुम्ही तुमचे नाव या यात्रेसाठी नोंदवू शकता. ही यात्रा 60-60 यात्रेकरूंच्या 18 तुकड्यांमध्ये प्रवास करते. प्रत्येक तुकडीला आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी 24 दिवस लागतात. त्यातील पहिले तीन दिवस दिल्लीत तयारीसाठी जातात.