Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कमलनाथ यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, राज्यपालांकडे मागितली भेटीची वेळ

कमलनाथ यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, राज्यपालांकडे मागितली भेटीची वेळ
भोपाळ , शुक्रवार, 20 मार्च 2020 (12:40 IST)
मध्ये प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे. कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर आरोप करत राजीनामा देत असल्याची यांची माहिती दिली. भाजपकडे १५ वर्षे होती, मला फक्त १५ महिने मिळाले. मात्र १५ महिन्यात भरपूर विकास करण्याचा प्रयत्न केला. जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं, त्यामुळेच भाजपला हे सहन झालं नाही. त्यामुळे भाजपनं काँग्रेसचे आमदार फोडले, असा घणाघात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला. आज त्यांनी काँग्रसने केलेल्या विकासकामांचा पाढाच वाचला, त्यावेळी त्यांना भाजपवर शरसंधानही साधलं. दरम्यान, कमलनाथ यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आहे. 
 
मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी आज घेण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे बहुमत चाचणीच्या अग्निपरिक्षेतून कमलनाथ सरकार तरणार की जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
गुरुवारी सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, शुक्रवारी सकाळी विधानसभेचे सत्र आयोजित करून सायंकाळी 5 वाजेपर्यंत कमलनाथ सरकारने बहुमत चाचणी घ्यावी. बहुमत चाचणीवेळी हात उंचावून मतदान घेतले जाईल. सभागृहात पार पडणार्‍या या कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. कॉँग्रेसच्या कर्नाटकात असणार्‍या 16 आमदारांना जर या बहुमत चाचणीत सहभागी व्हायचे असेल तर त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करून भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी अल्पमतात असलेले हे सरकार कोसळणार असल्याची टीका केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुत्र्यांनाही कोरोनाची लागण, एकाचा मृत्यू