Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आठ बँक कर्मचार्‍यांचा सडक अपघातात मृत्यू

आठ बँक कर्मचार्‍यांचा सडक अपघातात मृत्यू
, गुरूवार, 10 नोव्हेंबर 2016 (12:44 IST)
कानपूर- 500 आणि 1000 रुपय्यांच्या नोटा बदलण्यात आम जनतेला त्रास नको म्हणून रात्री उशिरा बँकेत काम करून परत येत असलेल्या एसबीआयच्या ब्रांच मॅनेजरसह 8 कर्मचार्‍यांचा बिधून येथे सडक अपघातात मृत्यू झाली. ते सर्व एक व्हॅनमध्ये बरोबर प्रवास करत होते तेव्हा बिधूनमध्ये बुधवारी रात्री कंटेनर- व्हॅनची टक्कर झाला. टक्कर इतकी भयावह होती की पोलिसांनी शव काढायला दोन तास लागले.
 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की व्हॅन योग्य दिशेने येत होते परंतू कंटेनर अनियंत्रित झाल्यामुळे टक्कर झाली. व्हॅन दलादलामध्ये कोसळली आणि कंटेनर त्यावर पडला. ज्यामुळे व्हॅनमध्ये प्रवास करते असलेले घटनास्थळीच मृत्युमुखी पडले. वीस मिनिटांनंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी अॅम्बुलेंसही बोलवली परंतू तेव्हापर्यंत आठी लोकं जीव गमावून बसले होते.
 
घटनेनंतर कंटेनर चालक तिथून फरार झाला असून पोलिसांनी कंटेनर जप्त केले. ही बातमी कळल्यावर बँकेच्या इतर कर्मचार्‍यांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले तसेच मृतकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोटा बंद: येथे मिळतील आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर