कर्नाटक निवडणूक निकाल : कर्नाटकात द्वेषाचा बाजार उठला आहे. प्रेमाची दुकाने सगळीकडे उघडली आहेत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद व्यक्त केला.
विजय दृष्टिपथात आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, "सर्वात आधी मी कर्नाटकची जनता, काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते यांचे आभारम मानतो आणि अभिनंदन करतो. कर्नाटकच्या निवडणुकीत एका बाजूला क्रोनी कॅपिटलिस्ट लोकांची ताकद होती. दुसऱ्या बाजूला गरिब जनतेची शक्ती होती. गरिबांच्या शक्तीने त्यांच्या ताकदीला हरवलं. हेच यापुढे दुसऱ्या राज्यातही होईल.
काँग्रेस पक्ष कर्नाटकात गरिबांच्या बाजूने उभा राहिला. गरिबांच्या मुद्द्यावरच आम्ही लढलो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण द्वेष किंवा चुकीचे शब्द वापरून ही लढाई लढलो नाही. आपण प्रेमाने आणि मोकळ्या मनाने ही लढाई लढलो.
प्रेम या देशाला हवंहवंसं आहे, हेच या निवडणुकीतून कर्नाटकच्या जनतेने सर्वांना दाखवून दिलं आहे. कर्नाटकात द्वेषाचा बाजार उठला आहे. प्रेमाची दुकाने सगळीकडे उघडली आहेत. त्यामुळे सर्वात आधी हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे. आम्ही निवडणुकीत जनतेला पाच वचन दिले होते. ते पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण करू, असं राहुल गांधी म्हणाले.त्यांनी कर्नाटकात काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयाबाबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे अभिनंदन केले. ही निवडणूक गरीब आणि श्रीमंत यांच्यातील लढाईची असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.