Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Karnataka:व्हिडीओ बनवताना धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू

Karnataka:व्हिडीओ बनवताना धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू
, मंगळवार, 25 जुलै 2023 (13:47 IST)
सध्या सर्वत्र पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात लोक वर्षाविहारासाठी बाहेर पडतात. धबधब्याच्या ठिकाणी , नदी पात्रात फोटो काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. सध्या रिल्स बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. कोणत्याही गोष्टीचा फोटो काढून त्याला सोशल मीडियावर टाकून जास्ती लाईक्स आणि फॉलोअर्स मिळण्यासाठी लोक काहीही करतात. रिल्स बनवण्याचा नादात ते आपला जीव धोक्यात घालतात. अनेक वेळा रिल्स बनवताना झालेल्या अपघाताचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. तरीही लोक बेसावधपणे रिल्स बनवतात. सध्या सोशल मीडियावर रिल्सच्या नादात धबधब्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

व्हिडीओ काढताना दगडा वरून पाय घसरून धबधब्याच्या पाण्यात हा तरुण वाहून गेला. सदर घटना कर्नाटकातील कोल्लूरजवळील अरसीनागुंडी धबधब्याचा आहे. या धबधब्याच्या मध्ये दगडावर हा तरुण उभारून रिल्स बनवत आहे. तर त्याच्या मागे असलेली व्यक्ती त्याचा व्हिडीओ बनवत होती. 

त्या तरुणाचा अचानक दगडावरून पाय घसरला आणि तो वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. अपघाताची माहिती मिळतातच बचाव पथक त्याचा शोध घेण्यासाठी गेले मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही. या प्रकरणी कोल्लूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Eye Flu: पावसाळ्यात आय फ्लूचा धोका झपाट्याने वाढत आहे, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या