rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पार्सल स्फोट : काश्मिरी समाजसेवक नहार यांना मारण्याचा प्रयत्न

kashmir sfot
, बुधवार, 21 मार्च 2018 (14:52 IST)

अहमदनगर येथे कुरिअर पार्सलमध्ये स्फोट झाला आहे. या प्रकरणात स्फोटाप्रकरणी आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते जे काश्मिरी मुलांसाठी काम करतात ते  संजय नहार यांना पाठवण्यात येत  होते. त्याच रियर पार्सलमध्ये हा स्फोट झाल्याचं सूत्रांनी म्हटलंय आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय नहार हे सरहद संस्थेचे संस्थापक आहेत. सरहद ही संस्था जम्मू काश्मीरमध्ये शांतीसाठी अनेक वर्षे प्रयत्न करते आहे. कुरियर स्फोटात तीन जण गंभीर जखमी झालेत. कार्यालयातील एका पार्सलमध्ये हा स्फोट झाला आहे. कंपनीचे कर्मचारी रात्री दहाच्या सुमारात पार्सल सोडत होते त्यावेळी अचानक हा स्फोट झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्वजखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. मात्र हा मोठा कट असल्याचे प्राथमिक दिसून येते आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

facebookला डिलीट करण्याची वेळ आली आहे : एक्टन ब्रायन