केंद्राच्या गुरांच्या खरेदी-विक्री संदर्भात घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी केरळ विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवले होतं. या अधिवेशनला केरळचे आमदार बीफ फ्राय खाऊन हजर झाले होते. बीफ फ्रायच्या पार्टीनंतर कत्तलखाने, गुरांची विक्री तसंच शेतकऱ्यांच्या समस्या या मुद्द्यावर केरळ विधानसभेत आमदारांनी चर्चा केली. विधानसभेच्या सभागृहात जाण्यापूर्वी केरळचे सगळे आमदार कॅन्टीनमध्ये गेले. तिथे बीफ फ्रायच्या मेजवानीचं आयोजन केलं होतं. ‘रोज आम्ही सकाळी अकराच्या आधी ‘बीफ’ सर्व्ह करीत नाही. पण, अधिवेशनाचा विषय बीफ संबंधी होता. त्यामुळे आम्ही दहा किलो ‘बीफ’ची ऑर्डर दिली होती.'अशी माहिती कॅन्टीनचालकांनी दिली आहे.