Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केरळ पूर: 324 बळी

केरळ पूर: 324 बळी
केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. येथे 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूराने 324 जणांचा बळी घेतला आहे.
 
मुसळधार पावसाने केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले असून आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 2 लाख लोकं बेघर झाले आहेत. जोरदार पावसामुळे आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झाल्याचे समोर आले आहे. व्यवसाय, पिक व इतर सुविधांची हानी होत आहे. इकडे हवामान खात्यानं राज्यातील पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 
 
पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री राज्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केंद्राकडून जास्तीची मदत मागितली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकच पंतप्रधानपदाची इम्रान खान घेणार आज शपथ