केरळचे वरिष्ठ खासदार इ अहमद यांना सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले आहे.
अधिवेशनादरम्यान संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना ते जागेवरच कोसळले होते. त्यानंतर त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते.
इंडियन युनियन मुस्लिम लिगचे ते खासदार होते तसेच संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये ते मंत्रीही होते. वरिष्ठ सोनिया गांधींसह वरिष्ठ कॉग्रेस नेते आणि मंत्र्यांनी राममनोहर लोहिया रुग्णालयात धाव घेतली आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोंदींसह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.