Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Keral : धक्कादायक! मोबाईलसाठी मुलाने केला आईवर जीवघेणा हल्ला ,आरोपी मुलाला अटक

arrest
, शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 (19:16 IST)
सध्याच्या काळात मोबाईल खूप प्रगत झाला आहे. याद्वारे तंत्रज्ञान प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचले आहे.
मोबाईलवर दिसणारे जग इतके आकर्षक दिसते की लहान.मुलांना मोबाईल देऊन स्वतःच्या कामात व्यस्त होणाऱ्या आपल्या सर्वांसाठी ही बातमी एक धडा आहे. केरळमध्ये मोबाईल वापरण्यास नकार दिल्याने मुलाने आईवर अमानुष हल्ला केला. यानंतर महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला.  
 
मोबाईल एखाद्या घातक ड्रगप्रमाणे मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. आईच्या हत्येचा आरोप असलेल्या मुलाला पोलिसांनी अटक 
केली आहे. 
 
सदर घटना आहे कन्नूर जिल्ह्यातील कनिचिराची येथे राहणाऱ्या 63 वर्षीय महिलेला रुग्मिणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्मिनीवर गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयातउपचार सुरू होते. शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या महिलेच्या मुलाने मोबाईल चालवायला रोखल्यामुळे रागाच्या भरात येऊन आपल्या आईचे डोकं पकडून भिंतीवर आपटले या मुळे महिला गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केले. महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कन्नूर जिल्ह्यात कनिचिरा येथे राहणाऱ्या रुग्मिणी नावाच्या महिलेचा मुलगा सुजित याला मोबाईलचे व्यसन लागले. महिलेने त्याला मोबाईल जास्त पाहू नकोस असं म्हणत रोखले होते. या वर सुजीतला आईचा राग आला आणि त्याने आपल्या आईवर जीवघेणा हल्ला केला. तिचं डोकं भिंतीवर आपटलं.

ती गंभीर जखमी झाली. घरच्यांनी तिला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. पोलिसांनी आरोपी सुजीतची चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याचे मान्य केले. त्याने सांगितले की आई मला सतत मोबाईलवरून बोलायची मला मोबाईल  जास्त चालवू नको म्हणायची .पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आरोपी मुलगा सुजित हा मानसिक  दृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना एकदा कोझिकोडमधील कुथिरावट्टम येथील सरकारी मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsApp : 24 ऑक्टोबरपासून या फोनवर व्हाट्सअप काम करणार नाही