Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय नौदलात 'खांदेरी' अत्याधुनिक पाणबुडी दाखल

भारतीय नौदलात 'खांदेरी' अत्याधुनिक पाणबुडी दाखल
, गुरूवार, 12 जानेवारी 2017 (17:22 IST)
भारतीय  नौदलात खांदेरी ही अत्याधुनिक पाणबुडी दाखल झाली आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते ‘खांदेरी’चे जलावतरण मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात आले. फ्रान्सची मेसर्स डीसीएनएस कंपनी आणि माझगाव गोदी यांनी संयुक्तरित्या या पाणबुडीची बांधणी केली आहे. खांदेरी पाणबुडी ही डिझेल आणि वीजेवर चालणारी आहे. अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी खांदेरी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. खांदेरीमध्ये ट्यूबद्वारे लाँच होणाऱ्या अँटीशिप मिसाईल्सचाही समावेश आहे. या मिसाईल्स पाण्यात किंवा बाहेर डागता येऊ शकतात. छत्रपती शिवरायांनी सागरावर प्रभुत्व ठेवण्यासाठी खांदेरी बेटावर केलेल्या लढायांची स्मृती जपण्यासाठी पाणबुडीला खांदेरी हे नाव देण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे राहुल गांधी अस्वस्थ - स्मृती इराणी