rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयएनएक्स मीडिया प्रकरण : कार्ती चिदंबरम यांना अटक

kirti chidambaram
, बुधवार, 28 फेब्रुवारी 2018 (15:21 IST)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना सीबीआयने चेन्नईतून अटक केली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी कार्तीला अटक करण्यात आली. लंडनला गेलेले कार्ती चेन्नई विमानतळावर परत येताच त्यांना अटक करण्यात आली. चेन्नई विमानतळावरच सीबीआयकडून कार्ती यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना दिल्लीला नेलं जाणार आहे.
 
आयएनएक्स मीडियामध्ये 2007 साली 300 कोटींची परकीय गुंतवणूक आणण्यासाठी परवानगी घेताना गैरप्रकार झाल्याचा कार्ती यांच्यावर आरोप आहे. त्यावेळी पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते. याप्रकरणी कार्ती यांच्यावर गेल्या वर्षी मे महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सकाळी १० :३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे