Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोलकाता : महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणातील आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी

jail
, शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (19:09 IST)
महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या कथित बलात्कार आणि हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला कोलकाता न्यायालयाने शनिवारी 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अटकेनंतर आरोपीला शनिवारी सियालदह न्यायालयात हजर करण्यात आले. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 64 (बलात्कार) आणि 103 (हत्या) अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, "कोर्टात आरोप सिद्ध झाल्यास कथित लैंगिक अत्याचार आणि महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येतील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल याची पोलिस खात्री करतील."
 
उत्तर कोलकाता येथील सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये शुक्रवारी एका महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालात तिच्या हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी झाली. रात्रीच्या ड्युटी दरम्यान उपस्थित असलेल्या इतर डॉक्टरांच्या वर्णनासह कथित परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली.

या प्रकरणात एसआयटी स्थापित करण्यात आली आहे. पुराव्याच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. पुरावे गोळा करत आहोत. लोकांची चौकशी करत आहो. 

मृतदेहाच्या शवविच्छेदनाची व्हिडीओग्राफी करण्यात आली असून त्यावेळी कुटुंबीय उपस्थायीत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपी बाहेरचा असून त्याचे रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये प्रवेश होते. आरोपीच्या हालचाली संशयास्पद आहे. या प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी केली जाईल, असे उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कुटुंबीयांनी मागणी केल्यास अन्य एजन्सीमार्फतही तपास केला जाऊ शकतो. 
 
Edited by - Priya Dixit   
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बांगलादेश : सरन्यायाधीश ओबैदुल हसन यांचाही राजीनामा, आंदोलकांनी दिला होता निर्वाणीचा इशारा