Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावणार

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावणार
चारा घोटाळ्या दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. लालू यांच्यासहीत १६ जणांना २३ डिसेंबरला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चारा घोटाळ्यात दोषी ठरवले होते. पोलिसांनी त्याच दिवशी सर्वांची रवानगी रांची येथील बिरसा मुंडा सेंट्रल कारागृहात केली होती. 
 
सीबीआय विशेष न्यायालयाने लालू यादव यांना फसवणूक करणे, कट रचणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपा कलम ४२०, १२०-बी आणि पीसी अ‍ॅक्ट १३(२) नुसार दोषी ठरवले होते. १९९४ ते १९९६ दरम्यान देवघर जिल्हा कोषागारातून ८४.५ लाख रूपये काढले गेले होते. 
 
सीबीआयने या प्रकरणात देवघर कोषागारातून खोटी बिल सादर करून पैसे काढण्यात आल्याचा आरोप सर्वांवर लावला होता. लालू प्रसाद यांच्यावर या प्रकरणाची माहिती असूनही याला आळा न घालण्याचा आरोप आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साई चरणी 14 कोटीचे दान जमा