काश्मीरमध्ये भूस्खलन; दोन जवानांचा मृत्यू

सोमवार, 16 डिसेंबर 2019 (12:33 IST)
जम्मू-काश्मीरच्या महामार्गावरील रामबनजवळ गाडीवर भूस्खलन झाल्याने या दुर्घटनेत सीआरपीएफच्या  डीआयजीसह दोघांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.
 
जखमी जवानाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून माती हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून या ठिकाणी भूस्खलन होत आहे. माती हटवण्याचे काम सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे.
 
जम्मू-काश्मीरच्या हायवेवर रामबनजवळ सीआरपीएफची गाडी उभी असताना अचानक मातीचा ढीग व दगड गाडीवर पडले. या भूस्खलनात गाडीतील डीआयजीसह तिघेजण गंभीर जखी झाले होते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख फडणवीसांचे टीकास्त्र : सत्तेसाठी किती लाचारी ठेवावी?