Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

चलो अयोध्या! आदित्य ठाकरेंचा आज दौरा ढोल-ताशाच्या गजरात शिवसैनिक रवाना

aditya thackeray
मुंबई , बुधवार, 15 जून 2022 (15:02 IST)
शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत. तर, दौऱ्याच्या आढावा घेण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत सोमवारपासून अयोध्येत तळ ठोकून आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत.
 
आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर जात असून त्याआधीच शिवसेना नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं विशेष गाड्या करून अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत पोहचलेल्या शिवसेना नेत्यांमध्ये खासदार संजय राऊत यांच्यासह उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, आमदार यामिनी जाधव, शिवसेना उपनेते यशवंत जाधव आदी नेते दाखल झाले आहेत. तर, हा दौरा राजकीय नसल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कामाचे पैसे न दिल्याने मालकाला बॉम्बने उडवून देण्याचा प्रयत्न