Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आसाराम बापूला जन्मठेप

आसाराम बापूला जन्मठेप
लैंगिक अत्याचार प्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य दोन आरोपींना २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेय. दरम्यान, सुनावणीवेळी हिंसाचार भडकू नये यासाठी जोधपूरपासून दिल्लीपर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जोधपूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलंय. रामरहिम खटल्याच्यावेळी हिंसा भडकली होती. तसा प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवलाय.
 
दरम्यान, आसाराम विरोधात गुजरातमध्ये बलात्काराचा खटला सुरू असल्याने त्याला या प्रकरणात काय शिक्षा होते, याचीही उत्सुकता आहे. दरम्यान, जन्मठेपेची शिक्षा देताना अध्यात्मिक गुरु आसाराम बापू याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात  जोधपूरमधील न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने आसाराम बापूसह सर्व आरोपींना दोषी ठरवले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बलात्कार प्रकरणात आसाराम दोषी