Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

LIVE: हिट अँड रन प्रकरणी सलमान दोषी

LIVE: हिट अँड रन प्रकरणी सलमान दोषी
मुंबई , बुधवार, 6 मे 2015 (11:11 IST)
गेली तेरा वर्षे चाललेला व बहुचर्चित सलमान खानचा हिट अँड रन अखेर निर्णय झालाअसून, दारूच्या नशेत सलमानच गाडी चालवत होता, त्याच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स नव्हता - कोर्ट त्याशिवाय हिट अँड रन प्रकरणी सलमान दोषी, त्याच्यावरील सर्व आरोप सिद्ध - न्यायाधीश.
 
न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानला आज सकाळी 11.15 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 13 वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत सलमान खानने केलेल्या अपघातामध्ये एक ठार आणि पाच गंभीर जखमी झाले होते, असा आरोप सरकारी पक्षाने केला आहे. तो सिद्ध करण्यासाठी 27 साक्षीदारांचा जबाबही नोंदविला आहे. सलमानने या आरोपांचे खंडन केले असून त्या दिवशी दारू प्यायलो नव्हतो आणि गाडीही चालवत नव्हतो, असा दावा केला आहे. अपघाताच्या दिवशी आपला वाहनचालकच गाडी चालवत होता, असा दावाही सलमानने केला. त्याचा चालक अशोकसिंह यानेही स्वत: गाडी चालवत असल्याची कबुली काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi