'चंद्रयान 3' चंद्रापासून 30 किलोमीटर उंचीवर असताना काय-काय होईल?
श्रीहरिकोटा इथून 14 जुलैला प्रक्षेपित झालेलं चंद्रयान-3 यान 40 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहे.
या चंद्रयानमधलं लँडर चंद्रावर उतरायला सुरुवात करेल तेव्हापासूनचा प्रत्येक क्षण हा यानाचं लँडिग यशापयश ठरवणारा असेल.
हे लँडर उतरतानाचे अनेक टप्पे आहेत आणि या टप्प्यांमबद्दल इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिलीय.
वाजता पोस्ट केलं 15:2615:26
चंद्रयान-3 मोहीम यशस्वी होण्यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांकडून सदिच्छा
पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी भारताच्या चंद्रयान-3 मोहीम यशस्वी व्हावी म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या. तसंच, इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदनही केले.
'चंद्रयान-3' यानाचं लँडिंग दक्षिण ध्रुवावर उतरणार
चंद्रयान-3 ची तीन उद्दिष्टं
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-3 साठी प्रामुख्याने तीन उद्दिष्टं निश्चित करण्यात आली आहेत.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचं सॉफ्ट लँडिंग करणं
लँडरमधून रोव्हरला उतरवणं आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरून फिरवणं
लँडर आणि रोव्हरच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाचं अन्वेषण करणं
नासापेक्षा स्वस्तात भारताची इस्रो अवकाश मोहिमा कशा आखते?
चंद्रयान 3 च्या निमित्ताने भारताच्या अंतराळ मोहिमेची जोरदार चर्चा होतेय, पण जागतिक अवकाश उद्योगात भारताचा वाटा फक्त 2 टक्के आहे. हाच वाटा वाढवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत.