Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांचा अपघात, 11 ठार

तेंदुपत्ता
मध्य प्रदेशात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या गोंदियातील 11 मजुरांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर अन्य 15 मजूर जखमी आहेत. 
 
मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये ही घटना घडली. सर्व मृतक गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील रहिवासी आहेत. जबलपूरमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर जबलपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मजुरांना आणण्यासाठी वन विभागाने तेंदुपत्ता ठेकेदाराला सरकारी गाडी दिली होती. ठेकेदाराचा चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. नरसिंहपूर-गोटेगाव मार्गावर एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाला, अशी माहिती आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईतल्या कोस्टल रोडला अंतिम मंजुरी, वाहतुकीची कोंडी फुटणार