मोठी बातमी असून महाराष्ट्र आणि देशाला धक्का देणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. बॉम्बस्फोटांप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह अन्य आरोपीविरोधात मंगळवारी एनआयएकडून आरोप निश्चित करण्यात आले. २००८ साली मालेगाव येथे बॉम्बस्फोट घडवला गेला होता. साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहितसह अन्य सात आरोपींविरोधात दहशतवादी कट आखणे, हत्या आणि अन्य आरोप ठेवण्यात आले आहेत. आपल्याविरोधात आरोप निश्चित करण्याला स्थगिती देण्यासाठी कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य व्यक्तींनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावली होती. आरोप निश्चित होताच सर्वांनी त्यांच्यावर आरोपाचा इन्कार केला आहे. आम्ही हे केलेच नाही असे स्पष्टीकर दिले आहे.मालेगावमधील भिक्कू चौक येथील मशिदीजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १००हून अधिक लोक जखमी झाले होते.