Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ममता बॅनर्जी यांची शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा, बंगालमध्ये भाजपविरोधी मेळाव्याची तयारी

ममता बॅनर्जी यांची शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा, बंगालमध्ये भाजपविरोधी मेळाव्याची तयारी
, मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (08:37 IST)
पश्चिम बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि तृणमूल यांच्यातील संघर्ष आणखी वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी या भाजपविरोधी पक्षांवर लक्ष केंद्रीत करत आहेत. पुढील महिन्यात कोलकाता येथे एक रॅली काढली जाण्याची शक्यता आहे.
 
सीएम ममता यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टालिन यांचे आभार मानले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली.
 
ममता बॅनर्जी या पुढील महिन्यात जानेवारीत कोलकातामध्ये भाजपविरोधी मेळाव्याची तयारी करत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, शरद पवारांशी चर्चेदरम्यान ममतांनी त्यांना आमंत्रणही दिले आहे. यावेळी इतर विरोधी पक्षातील नेते देखील एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई महापालिकेने कोरोना लसीकरणासाठी 'अशी' केली आहे तयारी